वाळकेश्वरमध्ये इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला; ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2026

वाळकेश्वरमध्ये इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला; ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


मुंबई, दि. ३० जून (जेपीएन न्यूज डेस्क) : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात बाबुलनाथ रोडवरील सूर्यप्रकाश इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. (Walkeshwar Balcony Collapse, 51-Year-Old Man Killed)

मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, रात्री ११.२२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. वाळकेश्वर येथील बाबुलनाथ रोडवरील जी+३ मजली म्हाडा सेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळला.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संतोष रामचंद्र भरसकर (वय ५१) यांना रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages