NEET-UG आणि NEET-PG परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, BMC MARDचे पंतप्रधानांना निवेदन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2026

NEET-UG आणि NEET-PG परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, BMC MARDचे पंतप्रधानांना निवेदन


मुंबई | जेपीएन न्यूज - वैद्यकीय शिक्षणातील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व बळकट करण्यासाठी NEET-UG आणि NEET-PG परीक्षांमध्ये तातडीने व्यापक शैक्षणिक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका निवासी डॉक्टर संघटना (BMC MARD) यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

BMC MARDच्या अध्यक्षा डॉ. ऋतुजा राऊत यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या चिंता मांडण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण हा भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात NEET-UG आणि NEET-PG परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आणि जलदगती तपास यंत्रणा स्थापन करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, दरवर्षी निश्चित परीक्षा दिनदर्शिका जाहीर करावी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने सकारात्मक संवाद साधावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

डॉ. ऋतुजा राऊत यांनी सांगितले की, देशाच्या भविष्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह वैद्यकीय शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा BMC MARDने व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS