Orange Alert - मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2026

Orange Alert - मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ५ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी सोमवार, ६ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कामावर हजर राहावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages