Red Alert - मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2026

Red Alert - मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ४ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शनिवार, ४ जुलै रोजी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने नागरिकांनाही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages