Orange Alert - मुंबई, ठाण्यात मंगळवारीही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2026

Orange Alert - मुंबई, ठाण्यात मंगळवारीही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क | ६ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजीही ऑरेंज अलर्ट कायम ठेवत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद राहतील. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १९१६ या महापालिकेच्या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS