
वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरोप केला की, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भाजप सरकार लोकशाहीविरोधी भूमिका घेत आहे. काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे "चोर तो चोर, वरून शिरजोर" असा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावरही त्यांनी टीका करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. तसेच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील घडामोडींच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने लोकभवन परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष रवी बावकर, केतन शाह, अर्शद आझमी, भावना जैन, राजपती यादव, नगरसेवक हैदर अली शेख, अजंता यादव, वखार खान, राजेश शर्मा, अवनीश सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.


No comments:
Post a Comment