वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघे किरकोळ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2026

वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघे किरकोळ जखमी


मुंबई | जेपीएन न्यूज | 8 जुलै -
मुंबईतील वडाळा (पूर्व) येथील शांतिनगर परिसरात मंगळवारी एका भुईमजला अधिक एक (G+1) इमारतीचा पहिला मजला कोसळून तिघेजण किरकोळ जखमी झाले. ही घटना विद्यालंकार कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या सम्राट मेडिकल येथे घडली.

मुंबई अग्निशमन दलाला सकाळी ११.३२ वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनेपूर्वीच स्थानिक नागरिकांनी जखमींना खासगी वाहनातून दीपांश क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर तिघांनाही घरी सोडण्यात आले.

जखमींमध्ये खुशबू खान (२७) यांना डोक्याला किरकोळ दुखापत, आशीष सिंह (४०) यांना डाव्या हाताला तर सुनील यादव (३०) यांना उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, ढिगाऱ्याखाली कोणीही अडकल्याची नोंद नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS