११ ऑगस्टला मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; एच पूर्व विभागात २४ तास पाणीबंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2026

११ ऑगस्टला मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; एच पूर्व विभागात २४ तास पाणीबंदी


मुंबई / JPN NEWS -
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २४०० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ११ ऑगस्ट (मंगळवार) सकाळी १० ते १२ ऑगस्ट (बुधवार) सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर एच पूर्व विभागात २४ तास पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, के दक्षिण विभागातील कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, फिश मार्केट, घाटीवाडा, चकाला, पी अँड टी वसाहत, कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर, मोगरापाडा, सहार गाव, सुतार पाखडी आणि कार्गो संकुल या भागांत वेळापत्रकानुसार कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

तर एच पूर्व विभागातील सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व), देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात ११ ऑगस्ट सकाळी १० ते १२ ऑगस्ट सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS