भांडुपमध्ये मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा दुर्दैवी मृत्यू; चालता चालता अचानक कोसळले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2026

भांडुपमध्ये मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा दुर्दैवी मृत्यू; चालता चालता अचानक कोसळले


मुंबई JPN NEWS - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे जनसंपर्क अधिकारी (PRO) आशिष मेटे यांचा भांडुपमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीच्या आवारात शतपावली करत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे भांडुप येथील त्यांच्या इमारतीच्या आवारात चालत होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. खाली पडताना डोक्याला जोरदार मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

आशिष मेटे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर येताच मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयासह राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयातच त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत पुढील तपासानंतर अधिक स्पष्टता होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS