
मुंबई JPN NEWS - धारावी परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान गुलिस्तान हॉटेलसमोर, माहिम-सायन लिंक रोड, धारावी येथे घडली.
फिर्यादी बैत्तुल्लाह अहमद बरकुल्लाह खान यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने कलीम अहमद खान (२८) याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला. या हल्ल्यात कलीम गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून ३० ऑगस्ट रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास शाहूनगर पोलीस करत आहेत.


No comments:
Post a Comment