
मुंबई - JPN NEWS, दि. ५ ऑगस्ट २०२६ :
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार घरोघर पडताळणी (BLO भेटी) ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, मतदान केंद्रांचे पुनर्रचनेचे काम १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
सुधारित वेळापत्रकानुसार २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदारांना दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यावरील सुनावणी, नोटीस प्रक्रिया आणि निकाल २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण करण्यात येणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षांना देण्याचे निर्देश दिले असून, या बदलांची व्यापक प्रसिद्धी करण्यासही सांगितले आहे.


No comments:
Post a Comment