मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा - पालिका आयुक्त अश्विनी भिडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2026

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा - पालिका आयुक्त अश्विनी भिडे


मुंबई JPN NEWS - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदीबाबत आक्षेप असलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दावे-हरकती दाखल कराव्यात. यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

SIR कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात झाली. यावेळी मुंबईतील SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी, गणना पत्रांचे वाटप व संकलन, डिजिटायझेशन, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आदी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २९ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतींचा निपटारा करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांनी बीएलओंच्या समन्वयाने मतदारांशी संपर्क साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य करावे, असे भिडे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या SIR प्रक्रियेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS