सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी; ऑर्किड सिटी सेंटर मॉल रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2026

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी; ऑर्किड सिटी सेंटर मॉल रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू


मुंबई JPN NEWS - मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावरील ऑर्किड सिटी सेंटर मॉलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने समन्वित कारवाई सुरू केली आहे. मॉलमधील गाळे, युनिट्स व दुकानांचे मालक, विकासक तसेच वापरकर्ते आणि भोगवटादारांना इमारत रिकामी करण्याची संयुक्त नोटीस बजावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार, मॉलच्या संपूर्ण इमारतीची दुरुस्ती होऊन ती सुरक्षित असल्याचे आणि सर्व वैधानिक अटींची पूर्तता झाल्याचे महापालिकेचे समाधान होईपर्यंत इमारतीचा कोणताही वापर करता येणार नाही. तसेच या कालावधीत परिसरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या डी विभागात झालेल्या समन्वय बैठकीत इमारत व कारखाना विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, अग्निशमन दल, नागपाडा पोलीस आणि मॉलच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. त्यानंतर मॉल परिसरात प्रवेश व वापरास मनाई करणाऱ्या सूचना लावण्यात आल्या आहेत.

कारवाईच्या पार्श्वभूमीवर मॉलचा पाणीपुरवठा खंडित करण्यास, महानगरपालिका परवान्यांवर कारवाई करण्यास तसेच बांधकामासाठी आवश्यक वीज वगळता इतर वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक संरक्षण देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्यास मॉल रिकामा करण्यासह सील करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS