
मुंबई JPN NEWS - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात या परीक्षा होणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान घेण्यात येतील.
तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.
या परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येतील. तारखा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करणे, उजळणी आणि परीक्षेचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक आणि परीक्षेच्या वेळा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम विषयवार वेळापत्रकासाठी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ
https://www.mahahsscboard.in


No comments:
Post a Comment