तंबाखू न दिल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला; देवनारमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2026

तंबाखू न दिल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला; देवनारमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा


मुंबई JPN NEWS - तंबाखू दिली नाही या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने दोघांवर दगडाने हल्ला केल्याची घटना गोवंडीतील लिंबोणी बाग परिसरात घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वासात ते पावणेआठच्या सुमारास दत्तनगर, लिंबोणी बाग, गोवंडी येथील हनुमान मंदिराजवळ अमित गुलाब चंदनशिवे हे त्यांचा मित्र गौस मोहम्मद खान यांच्यासोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपीने तंबाखू मागितली. तंबाखू न दिल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात मारला. तसेच फिर्यादीच्या डाव्या गालावर आणि डाव्या गुडघ्यावरही दगडाने जोरदार प्रहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात दोघांना दुखापत झाली.

या प्रकरणी फिर्यादी अमित चंदनशिवे यांच्या तक्रारीवरून १५ सप्टेंबर रोजी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८३/२०२६ नोंद करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ११८(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS