
मुंबई JPN NEWS - शाळा सोडल्यानंतर शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात (LC) झालेली चूक दुरुस्त करता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, नोकरी आणि सरकारी कागदपत्रांच्या कामात अडचणी येत होत्या. या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्डमधील नजरचुकीची किंवा चुकीची नोंद योग्य पुरावे असल्यास दुरुस्त करता येऊ शकते. यामध्ये नाव, आडनाव, जन्मतारीख किंवा जात नोंदीतील चुकीचा समावेश होऊ शकतो. मात्र याचा अर्थ इच्छेनुसार नोंद बदलता येईल असा नाही. संबंधित नोंद चुकीची असल्याचे जन्म दाखला, जुनी शालेय कागदपत्रे किंवा इतर अधिकृत पुराव्यांद्वारे सिद्ध करावे लागेल.
विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचा? -
LC आणि शालेय रेकॉर्डमधील चुकीची माहिती पुढे आधारकार्ड, पासपोर्ट, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकरी किंवा जात प्रमाणपत्रासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे अशा वास्तविक चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे.


No comments:
Post a Comment