घरगुती वादातून पत्नीची गळा चिरून हत्या; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2026

घरगुती वादातून पत्नीची गळा चिरून हत्या; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू


मुंबई JPN NEWS - आग्रिपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती वादातून १९ वर्षीय तरुणाने आपल्या १९ वर्षीय पत्नीची स्वयंपाकघरातील चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद एहसान शेख (१९) याने पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पत्नी जन्नत एहसान शेख (१९) हिच्यावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना कलापानी चौकीजवळ घडली.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर एहसान याने त्याच हत्याराने स्वतःचा गळा चिरून घेतला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोघेही दैनंदिन मजुरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

या प्रकरणी आग्रिपाडा पोलिसांकडून पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पतीच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास आग्रिपाडा पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS