Breaking अभिनेता Imran Khan यांना २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; CJP आंदोलनातील सहभागानंतर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2026

Breaking अभिनेता Imran Khan यांना २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; CJP आंदोलनातील सहभागानंतर कारवाई


मुंबई JPN NEWS - बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेता आमिर खान यांचा भाचा इमरान खान यांना मुंबई पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिल्याचे वृत्त आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

१० ऑक्टोबर रोजी झालेल्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या इमरान खान यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. 

इमरान खान यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नसून ते अमेरिकेचे नागरिक आहेत. भारतात राहण्यासाठी त्यांच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. OCI कार्डधारकांना भारतात राहण्यासह काही सुविधा मिळतात; मात्र हे कार्ड भारतीय नागरिकत्वाच्या समकक्ष नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, परदेशी नागरिक असूनही राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध इमिग्रेशनविषयक तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. ही नोटीस ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’ मधील कलम ७ अंतर्गत जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या तरतुदीनुसार केंद्र सरकारला भारतातील परदेशी नागरिकांचा प्रवेश, निर्गमन, वास्तव्य किंवा हालचाली यांचे नियमन करण्याचे अधिकार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS