Mumbai भांडुपकरांच्या बसप्रश्नासाठी नगरसेविका राजुल पाटील मैदानात; बेस्ट प्रशासनाला धरले धारेवर! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

16 October 2026

Mumbai भांडुपकरांच्या बसप्रश्नासाठी नगरसेविका राजुल पाटील मैदानात; बेस्ट प्रशासनाला धरले धारेवर!


मुंबई JPN NEWS - भांडुप पश्चिम परिसरातील बेस्ट बससेवेच्या अनियमिततेमुळे प्रवाशांना दररोज होणाऱ्या त्रासाची दखल घेत प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजुल संजय पाटील यांनी प्रवाशांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही ठोस सुधारणा होत नसल्याने त्यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भांडुपकरांच्या बससेवेचे प्रश्न मांडत त्यांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

भांडुप पश्चिममधील बस क्रमांक ३०७, ५२२, ६०५, ६०६ आणि ४२८ या मार्गांवरील अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळेत बसची संख्या अपुरी असल्याने नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. उपलब्ध बसमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवासही त्रासदायक बनत आहे. या परिस्थितीकडे राजुल पाटील यांनी बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

सकाळच्या गर्दीत प्रवाशांचे हाल - 
सकाळी ६ ते ७.३० या गर्दीच्या वेळेत बसची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवाशांना एक ते दोन तास किंवा त्याहून अधिक काळ बसची वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बसच्या फेऱ्या अनियमित असल्याने उपलब्ध बसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडतो आणि बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही बेस्ट प्रशासनाकडे लेखी निवेदने आणि ई-मेलद्वारे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अपेक्षित सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राजोल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती मागितली आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

बस क्रमांक ३०७ च्या कमी अंतराच्या फेऱ्यांचाही प्रश्न - 
बस क्रमांक ३०७ च्या अनेक फेऱ्या गांधीनगर किंवा मंगतराम पेट्रोल पंप येथेच थांबविल्या जात असल्याने भांडुप पोलीस ठाणे, भांडुप रेल्वे स्थानक परिसर आणि पुढील भागात जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दाही नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित केला. या कमी अंतराच्या फेऱ्या भांडुप पोलीस ठाण्यापर्यंत चालविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, बस क्रमांक ६०५, ६०६ आणि ४२८ च्या फेऱ्या नियमित करणे, गर्दीच्या वेळेत बसची संख्या वाढविणे आणि सर्व संबंधित मार्गांवरील सेवा सुरळीत करणे, या प्रमुख मागण्या त्यांनी बैठकीत मांडल्या.

प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा -
भांडुप पश्चिममधील नागरिकांना दैनंदिन प्रवासात भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राजोल पाटील यांनी बेस्ट प्रशासनासोबत थेट चर्चा करून पाठपुरावा सुरू केला आहे. बैठकीत बेस्ट प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

आता प्रशासन या मागण्यांवर किती लवकर कार्यवाही करते आणि बसच्या फेऱ्या, उपलब्ध बसची संख्या व प्रवासी सुविधांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा कधी होते, याकडे भांडुपकरांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, गर्दीचा त्रास कमी व्हावा आणि दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ व्हावा, यासाठी बेस्ट प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS