टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेपुरती मर्यादित नसून सर्व वर्गांतील मतदारांच्या पात्रतेची निष्पक्ष पडताळणी करण्यासाठी आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत पार पडण्यासाठी संबंधित अभिलेखांची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दुबार ठरावांच्या आक्षेपाची चौकशी करा -
मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असताना, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुबार ठराव सादर केल्याच्या मुद्द्यावर आक्षेप नोंदवण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणात ठरावांच्या मूळ प्रती, आवक नोंदी, सादरीकरणाच्या तारखा, संबंधित संस्थांचे इतिवृत्त आणि अधिकृत प्रतिनिधी नियुक्तीची कागदपत्रे तपासण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
ठरावांचे दुबार सादरीकरण झाले आहे का, त्याचा संबंधित प्रतिनिधीच्या वैधतेवर किंवा मतदार पात्रतेवर परिणाम होतो का आणि लागू नियमांनुसार कोणती कार्यवाही आवश्यक आहे, हे स्पष्ट करावे. तसेच या आक्षेपावर चौकशी करून कारणांसह लेखी निर्णय द्यावा, असेही त्यांनी म्हटले.

गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाची पडताळणी -
एका सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित मतदार नोंदीबाबतही आक्षेप उपस्थित करण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले. प्राथमिक मतदार यादीत नाव असलेल्या संबंधित व्यक्तीचे संस्थेतील सभासदत्व वैध आहे का, याची खातरजमा करण्याची मागणी त्यांनी केली.
यासाठी संस्थेची मूळ सभासद नोंदवही, सभासदत्व मंजूर करणारा ठराव, प्रवेश अर्ज, सभासद क्रमांक आणि इतर अधिकृत कागदपत्रांची तपासणी करावी. त्यानंतर संबंधित व्यक्तीची मतदार म्हणून पात्रता नियमांनुसार निश्चित करावी, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांच्या सभासदत्वाबाबत प्रश्न -
प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित या संस्थेशी संबंधित प्रवीण यशवंत दरेकर यांच्या सभासदत्वाच्या पात्रतेबाबतही शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सहकार विभागाने ३ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशात दरेकर यांच्याकडे संबंधित मजूर सहकारी संस्थेचे सभासद म्हणून पुढे सुरू राहण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा निर्णय दिला होता.
असे असताना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सध्याच्या प्राथमिक मतदार यादीत त्यांचे नाव प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादितशी संबंधित सभासद म्हणून कोणत्या आधारावर समाविष्ट करण्यात आले, याची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. संबंधित आदेश, संस्थेच्या नोंदी आणि मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले.

अंतिम मतदार यादी पारदर्शक प्रक्रियेतून निश्चित करा
मुंबई बँकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर चौकटीत पार पडली पाहिजे. मतदार यादीतील प्रत्येक नोंद संबंधित कायदे, नियम आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वैध ठरली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.
व्यक्ती किंवा संस्था कोणतीही असो, सर्व मतदारांसाठी समान निकष लागू करून प्रत्येक नोंदीची पडताळणी करावी आणि कायद्यानुसारच अंतिम मतदार यादी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील आक्षेपांची निष्पक्ष चौकशी करून प्रशासनाने स्पष्ट निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:
Post a Comment