Mumbai साकीनाका येथील भंगार गोदामाला आग; चौघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2026

Mumbai साकीनाका येथील भंगार गोदामाला आग; चौघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू


मुंबई JPN NEWS - अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवरील अब्दुल रशीद कंपाउंडमध्ये असलेल्या भंगार गोदामाला मंगळवारी (२० ऑक्टोबर) सायंकाळी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने या आगीची तीव्रता लेव्हल-२ घोषित केली. या घटनेत चार जण भाजले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सायंकाळी ६.१८ वाजता आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलासह पोलीस, अदानी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित वॉर्ड कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सायंकाळी ६.३७ वाजता अग्निशमन दलाने आग लेव्हल-२ असल्याचे घोषित केले.

या आगीत तौफिक शादिल कुरेशी (२०) हे सुमारे ८० टक्के, जाहिद अबिदुल्ला कुरेशी (२०) हे ४० टक्के, कमल जलालुद्दीन शाह (४७) हे ४० टक्के, तर लालचंद रामलखन गौतम (४०) हे १० टक्के भाजल्याची माहिती मिळाली आहे. चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण आणि गोदामातील नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. अग्निशमन दलाकडून परिस्थिती हाताळण्यात आली असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS