महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला मिळणार राज्याचा सन्मान; ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

06 October 2026

महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला मिळणार राज्याचा सन्मान; ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी


मुंबई JPN NEWS - कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता धाडसी आणि साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्याचा आता राज्य सरकारकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. (Mumbai Police News) 

या पुरस्काराच्या माध्यमातून कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शौर्य पदकासोबत ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा - 
मुख्यमंत्री शौर्य पदकाची घोषणा दरवर्षी १ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी निश्चित संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. राज्यभरातील पोलिसांच्या क्षेत्रीय स्तरावरील धाडसी कामगिरीचे अहवाल आणि प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे पुरस्कारांची संख्या ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी उल्लेखनीय शौर्याची अधिक प्रकरणे समोर आल्यास त्यानुसार पुरस्कारांची संख्या निश्चित केली जाऊ शकणार आहे.

माओवादापासून संघटित गुन्हेगारीविरोधातील कामगिरीची दखल -
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी माओवाद, दहशतवाद, जातीय दंगली, संघटित गुन्हेगारी, तस्करी तसेच अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य धोक्यांच्या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः गडचिरोली आणि गोंदिया हे माओवाद प्रभावित जिल्हे असून, या भागात कार्यरत पोलिसांना अनेकदा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावावे लागते.

अशा धोकादायक परिस्थितीत उल्लेखनीय शौर्य दाखविणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय शौर्य पदक सुरू करण्यात येणार आहे.

केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर राज्याचा सन्मान -
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी पोलीस दलातील उल्लेखनीय शौर्याची दखल घेत विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

याच धर्तीवर महाराष्ट्रातही पोलिसांच्या धाडसी कामगिरीला स्वतंत्र राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री शौर्य पदक योजना सुरू करण्यात येणार आहे. काही अन्य राज्यांमध्येही पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्याप्रती समर्पणासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात.

पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली प्रथम निवड समिती -
मुख्यमंत्री शौर्य पदकासाठी पात्र पोलिसांची निवड करण्यासाठी बहुस्तरीय प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम निवड समिती कार्यरत राहणार आहे.

जिल्हास्तरावरून पोलीस अधीक्षक संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत प्रस्ताव सादर करतील. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांकडून प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात येतील.

यानंतर शासनस्तरावर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तावांची छाननी करेल. त्यानंतर अंतिम प्रस्ताव गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

मरणोत्तरही ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ -
कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या आणि उल्लेखनीय शौर्य दाखविणाऱ्या पोलिसांसाठीही या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शौर्य पदक मरणोत्तर देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाने पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया, विविध समित्यांची रचना तसेच पुरस्काराशी संबंधित अनुषंगिक खर्चासाठी आवश्यक तरतुदींनाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील धाडसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शौर्याला आता राज्य सरकारच्या स्तरावर स्वतंत्र मान्यता मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS