प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज केवळ NSP पोर्टलवर भरायचे आहेत. या विद्यार्थ्यांसाठी MahaDBT 2.0 पोर्टलवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करताना योग्य पोर्टलची निवड करावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
या चार शिष्यवृत्ती योजनांसाठी NSP वर अर्ज -
नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर पुढील योजनांसाठी नवीन अर्ज सादर करता येतील :
1 इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
2 विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
3 विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
4 व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेच्या पात्रता आणि उत्पन्नाच्या अटी तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित मुदतीत पूर्ण करावा.

नूतनीकरणासाठी MahaDBT पोर्टलच -
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या आणि २०२६-२७ मध्ये त्याच महाविद्यालयात द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ वर्षात शिक्षण सुरू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज पूर्वीप्रमाणे MahaDBT 2.0 पोर्टलवर सादर करावेत. अशा विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी NSP पोर्टलचा वापर करू नये, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर योजनांसाठी MahaDBT वरच अर्ज -
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता योजना, व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या प्रशिक्षण शुल्क परतावा योजनांचे अर्ज MahaDBT 2.0 पोर्टलवरच सादर करायचे आहेत.

अर्ज पडताळणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर -
अर्जातील त्रुटी दूर करणे आणि संस्थास्तरावरील पडताळणी पूर्ण करण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रे तपासून अर्ज सादर करावा. महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनीही संबंधित योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन सहायक संचालक रविकिरण मलकुनाईक आणि मयुरी कदम यांनी केले आहे.
पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी निर्धारित मुदतीचे पालन करावे, असे विभागाने म्हटले आहे.

No comments:
Post a Comment