Mumbai कांदिवलीत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2026

Mumbai कांदिवलीत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद


मुंबई JPN NEWS - कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज परिसरात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. मुलीला नातेवाईकांनी तातडीने कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी पहाटे २ वाजून २२ मिनिटांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास ठाकूर व्हिलेज येथील अल्पिन टॉवरमध्ये एका मुलीबाबत गंभीर घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित मुलीला नातेवाईकांनी उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले होते.

रुग्णालयात डॉक्टरांनी पहाटे २.२२ वाजता मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेहाचा पंचनामा केला. शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात येणार असून, मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात मुलीच्या वडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, त्यांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नसल्याचे पोलिसांच्या निवेदनात नमूद आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS