टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात हरियाणातून २२ वर्षीय महिलेला अटक; आरोपींची संख्या १३ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

03 November 2026

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात हरियाणातून २२ वर्षीय महिलेला अटक; आरोपींची संख्या १३ वर


मुंबई JPN NEWS - जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका महिला आरोपीला अटक केली आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून २२ वर्षीय महिलेला १ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे. या महिलेचा संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९०/२०२६ नोंदवण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

यापूर्वी १२ आरोपींना अटक - 
या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने राजस्थानमधील कोटा, दिल्ली आणि हरियाणातील सोनीपत येथून आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली होती. दरम्यान, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका), १९९९ मधील कलमे ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) वाढवण्यात आली.

तपास पुढे सुरू असताना संबंधित संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये हरियाणातील एका महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा पोलिसांच्या मदतीने १ नोव्हेंबर रोजी कर्नाल जिल्ह्यातून या २२ वर्षीय महिलेला ताब्यात घेऊन अटक केली.

गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू - 
या नव्या अटकेनंतर जुहू गोळीबार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १३ झाली आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींची भूमिका, संघटित टोळीचे जाळे आणि गोळीबारामागील कारणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS