Mumbai दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून स्थायी समितीत भाजप - काँग्रेसमध्ये खडाजंगी! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2026

Mumbai दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून स्थायी समितीत भाजप - काँग्रेसमध्ये खडाजंगी!


मुंबई JPN NEWS - मुंबईतील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आणि त्याबाबत जनजागृती करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत भाजपला थेट सवाल केले. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही प्रदूषणाबाबतचा जनजागृतीपर व्हिडिओ अद्याप पुन्हा अपलोड का करण्यात आला नाही? मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नाराजीमुळेच हा व्हिडिओ हटविण्यात आला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आझमी यांनी अमित साटम यांचे नाव घेताच भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर आणि मकरंद नार्वेकर आक्रमक झाले. साटम सभागृहात उपस्थित नसताना त्यांचे नाव घेण्याची गरज काय? स्थायी समितीत महापालिकेच्या विषयांवर बोला, प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करू नका, असा पलटवार भाजप नगरसेवकांनी केला. त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला.

भाजपचा विरोध, तरीही आझमी मुद्द्यावर ठाम! - 
गदारोळ सुरू असताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, गोंधळामुळे त्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. दुसरीकडे, भाजप नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता आझमी यांनी प्रदूषणाच्या प्रस्तावावरील आपली भूमिका मांडणे सुरूच ठेवले. 

दिया मिर्झाच्या व्हिडिओचा मुद्दा उपस्थित करून आझमी यांनी प्रदूषणाच्या प्रश्नाला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. भाजप नगरसेवकांच्या आक्षेपांनंतरही त्यांनी आपला मुद्दा सोडला नाही. त्यामुळे स्थायी समितीतील ही चर्चा केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित न राहता मुंबईतील प्रदूषण, जनजागृती आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरून रंगलेल्या राजकीय संघर्षाचा विषय ठरली.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS