नि:शुल्क स्वच्छतागृहांसाठी 6 सप्टेंबरला महिलांचे आंदोलन
मुंबई - महिलांसाठी नि:शुल्क स्वच्छतागृहांची सोय करण्याच्या मागणीसाठी 32 स्वयंसेवी संस्था-संघटना 6 सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
मुंबईत महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहांची सोय करण्याचे आश्वासन महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले होते. त्यासाठी विशेष तरतूदही केल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि या संस्थांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून मिळविलेल्या तपशिलानुसार नि:शुल्क महिला स्वच्छतागृहांसाठी अशी कोणतीही तरतूद नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अशी मोफत स्वच्छतागृहे बांधण्यासाठी लागणाऱ्या जागा शोधा, असे महापालिकेनेच या संस्थांना सुचवले. मुंबईत वर्षभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या "राईट टू पी' मोहिमेची दखल घेऊन, "मोफत स्वच्छतागृहे मिळणे हा महिलांचा अधिकारच आहे,' असे सांगण्यात आले होते. तसे फलक स्वच्छतागृहांबाहेर लावण्याच्या सूचना दिल्याचाही निर्वाळा देण्यात आला होता. तथापि सीएसटी रेल्वेस्थानक वगळता असे फलक कोणत्याही ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत आजही अनेक ठिकाणी महिलांकडून लघुशंकेसाठी शुल्क आकारले जाते. हा प्रश्न धसाला लावण्यासाठी या 32 स्वयंसेवी संस्थांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. म्हणूनच महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे असावीत, या मागणीसाठी 6 सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. |
Post Top Ad
01 September 2012
Home
Unlabelled
नि:शुल्क स्वच्छतागृहांसाठी 6 सप्टेंबरला महिलांचे आझाद मैदानात आंदोलन
नि:शुल्क स्वच्छतागृहांसाठी 6 सप्टेंबरला महिलांचे आझाद मैदानात आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment