टॅबलेट स्पर्धेत एमटीएनएल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2012

टॅबलेट स्पर्धेत एमटीएनएल

टॅबलेट स्पर्धेत एमटीएनएल
मुंबई - लॅंडलाईन, मोबाईल सेवेसाठी विख्यात असलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) आता टॅबलेटची विविध मॉडेल आणली आहेत. "टेरॉकॉम' या कंपनीशी सहकार्य करून एमटीएनएलने तीन टॅबलेट पीसी उपलब्ध करून दिले आहेत.

एमटीएनएलच्या टॅबलेटची किमान किंमत 3999 रुपये आणि कमाल किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे. "बिल्ट-इन' थ्री-जी सुविधा असणारी टॅबलेट 11 हजार रुपयांत उपलब्ध असेल. या टॅबलेटद्वारे दूरध्वनी कॉलही करता येतील, असे टेराकॉमचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अरोरा यांनी सांगितले. अन्य मॉडेलसाठी वाय-फाय आणि थ्री-जी डॉंगल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या टॅबलेट ग्राहकांच्या पसंतीला उतरतील, असा विश्‍वास एमटीएनएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. गर्ग यांनी व्यक्त केला. या सर्व टॅबलेट गुगल अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर आधारित असून एमटीएनएल थ्री-जी नेटवर्कच्या माध्यमातून 10 जीबीपर्यंतचे डेटा प्लॅन आणणार आहे. पहिल्या दोन महिन्यांसाठी 10 जीबी सेवा उपलब्ध असेल, असे एमटीएनएलचे कार्यकारी संचालक ए. के. भार्गव म्हणाले. एमटीएनएल या टॅबलेट देशभरात 500 ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS