मुंबई : दिवाळी एक महिन्यावर येऊन ठेपली असल्याने सालाबादप्रमाणे बोनसची चर्चा सुरू झाली आहे. दिवाळीत पालिका कामगारांना जास्तीत जास्त बोनस मिळवून देण्यासाठी आतापासून सर्व कामगार संघटनांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार-कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष आणि हिंदुस्थान कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिवाकर दळवी यांनी सन 2011-12 या आर्थिक वर्षाकरिता पालिका कामगार-कर्मचार्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.या सानुग्रह अनुदानाची रक्कम 30 ऑक्टोबर 2012 पूवी देण्याची मागणी दिवाकर दळवी यांनी केली असून यासंदर्भात लवकरात लवकर कामगार संघटनांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.
Post Top Ad
11 October 2012
Home
Unlabelled
कामगारांना 20 हजार बोनस देण्याची मागणी
कामगारांना 20 हजार बोनस देण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment