जुन्या इमारतींचा हेरिटेज यादीतील समावेश वगळावा - लाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2012

जुन्या इमारतींचा हेरिटेज यादीतील समावेश वगळावा - लाड


मुंबई : हेरिटेज वास्तूंच्या यादीत मुंबई बेट व शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती वगळाव्यात, असे आवाहन मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी केले आहे. यासंबंधी लाड यांनी मुंबई मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन सादर केले आहे.मुंबई शहरात 1940 पूवीपासूनच्या जुन्या इमारती असून त्यामधील बहुसंख्य इमारती या उपकरप्राप्त व मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपवण्यात आले आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष योजना करण्यात आली आहे. यामुळे इमारतींची पुनर्बाधणी करणे शक्य होणार आहे. नगरविकास कायद्यानुसार हेरिटेज समितीने यापूवी 2005 आणि 2008 मध्ये यादी तयार केली होती. आता नवी यादी तयार करण्यासाठी जुन्या इमारतींचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात उपकरप्राप्त आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा समावेश आहे. बहुसंख्य उपकरप्राप्त इमारती पुरातन वास्तू यादीमध्ये नसल्यामुळे मोडकळीस आलेल्या असलयामुळे त्यांची पुनर्बाधणी शक्य होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता या इमारतींचा समावेश नव्याने तयार करण्यात आलेल्या हेरिटेज यादीमध्ये करण्यात येऊ नये, अशी विनंती लाड यांनी े केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS