वॉर्डमध्ये स्थापत्य कामांसाठी नवीन पद्धत / भूमिपुत्रांना संधी मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2012

वॉर्डमध्ये स्थापत्य कामांसाठी नवीन पद्धत / भूमिपुत्रांना संधी मिळणार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वॉर्डमधील स्थापत्य कामे करण्यासाठी यापुढे नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे. यापुढे वॉर्डस्तरावर पाच ते सहा कंत्राटदारांचे पॅनल नेमण्यात येणार असून त्यांच्याकडून वॉर्डमधील स्थापत्य कामे केली जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंगळवारी दिली. 

गेल्या काही दिवसांमध्ये सीडब्ल्यूसी कंत्राटदारांच्या कामांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून अनेक प्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यातच या कंत्राटदारांची वाढीव मुदतही 30 सप्टेंबरला संपलेली असल्याने यापुढे वॉर्डमधील स्थापत्य कामे करण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबण्याचा विचार सुरू होता, असे शेवाळे यांनी सांगितले. त्यानुसार यापुढे वॉर्डमधील स्थापत्य कामे करण्यासाठी तीन लाखांपर्यंतची कामे वॉर्ड लेव्हलला कोटेशन मागवून केली जातील, तर यावरची 20 लाखांपर्यंतची कामे प्रभाग समितीत निविदा प्रक्रिया राबवून केली जाणार आहेत. यामध्ये परप्रांतीय कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भूमिपुत्रांना संधी दिली जाणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. 

या कंत्राटासाठी एमएमआरडीए, नवी मुंबई, ठाणे येथील ठेकेदारांनाही संधी दिली जाणार असल्याने या कामात अधिक पारदर्शकता येईल. हे सर्व ठेकेदार पालिकेच्या शहर अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली काम करणार असून या कामाचे ऑडिटही केले जाणार आहे. जर या ठेकेदारांनी व्यवस्थित काम केले नाही तर त्यांना पालिकेतून कायमचे हद्दपार केले जाणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS