एमपीएससी घोटाळयातील आरोपी शशिकांत कर्णिकांना दिलासा नाहीच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2012

एमपीएससी घोटाळयातील आरोपी शशिकांत कर्णिकांना दिलासा नाहीच


मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शशिकांत कर्णिक यांनी एमपीएससी घोटाळ्यातून आपल्याला मुक्त करण्यात यावे, यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. राज्यात 2002 मध्ये गाजलेल्या या घोटाळ्याचे ते प्रमुख सूत्रधार असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.   


एमपीएससी परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी कर्णिक व आयोगाच्या तत्कालीन बारा सदस्यांनी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधिकारी सुधाकर पुजारी यांनी कर्णिक यांना  अटक केली होती. 2000 मध्ये आयोगाचे अध्यक्ष असताना कर्णिक यांनी एमपीएससी परीक्षेला बसलेल्या 398 विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कर्णिक यांचा 2003 मधील जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS