'द इनोसन्स ऑफ मुस्लिम्स'च्या यू ट्यूबवरील आक्षेपार्ह दृश्‍यांवर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2012

'द इनोसन्स ऑफ मुस्लिम्स'च्या यू ट्यूबवरील आक्षेपार्ह दृश्‍यांवर बंदी

मुंबई - मुंबई पोलिसांनी केलेल्या सूचनेनंतर "द इनोसन्स ऑफ मुस्लिम्स' या सिनेमाच्या यू ट्यूबवरील आक्षेपार्ह दृश्‍यांवर बंदी घातली आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयात सायबर क्राईम विभागाच्या वतीने सांगण्यात आले, मात्र

गुगलच्या "सबसिडरी' असलेल्या यू ट्यूबवर सध्या "द इनोसन्स ऑफ मुस्लिम्स' हा इस्लामविरोधी सिनेमा सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे त्यावर बंदी घाला आणि संबंधित वेबसाईटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र यू ट्यूबवर अपलोड झालेल्या व्हिडीओचे "आयपी ऍड्रेस' (इंटरनेट प्रोटोकॉल अड्रेस) अद्याप मिळाले नसून त्यावर कारवाई झालेली नाही. हे "आयपी ऍड्रेस' भारताबाहेरील असल्यामुळे ते मिळाले नाही, असे मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे पोलिस निरीक्षक रवी सरदेसाई यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

याबाबत परदेशी न्यायव्यवस्थेमार्फत साह्य मिळविण्यासाठी "लेटर रोगेटरी' पाठविण्यात आले आहे, ऑनलाईनवर या सिनेमाच्या दृश्‍यांबाबत कसून तपास केला जात असून अशी दृश्‍ये डिलिट किंवा ब्लॉक केली जात आहेत, असेही यात म्हटले आहे. अमेरिकेत बनलेल्या या फिल्ममुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये तीव्र संताप आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS