मंत्रालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा स्टंट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2012

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा स्टंट


मुंबई - अनेकदा मागणी केल्यावरही नातेवाईकाकडे थकलेले पैसे मिळत नसल्याने एका तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी घडली. अंगावर रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या खिशात माचिस अथवा लायटर अशी कोणतीही वस्तू न सापडल्याने हा निव्वळ स्टंट असल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बालमुकुंद जैसवाल (31) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. चारकोप येथे राहणाऱ्या बालमुकुंदचा त्याच्या नातेवाईकासोबत थकीत पैसे न दिल्याचा वाद आहे. 2002 मध्ये सात लाखांना त्याच्या घराच्या जागेची विक्री केली होती. ही रक्कम त्याच्या नातेवाईकाकडे थकीत होती, असे सांगण्यात येते. आपली मागणी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोचावी यासाठी त्याने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मंत्रालयासमोर असलेल्या गार्डन गेटजवळ अंगावर रॉकेल ओतले. मात्र हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी बालमुकुंदला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे माचिस अथवा लायटर असे काहीही सापडले नाही. त्यामुळे हा केवळ स्टंट असल्याची माहिती मरीन ड्राईव्हचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक झुंजारराव घराळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS