स्थायी समिती अध्यक्ष शेवालेंच्या दीपावली पार्टीवर पत्रकारांचा बहिष्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2012

स्थायी समिती अध्यक्ष शेवालेंच्या दीपावली पार्टीवर पत्रकारांचा बहिष्कार

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांकडून सर्वच छोट्या मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांकडून बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. परंतु मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना व छोट्या वृतापात्रांच्या पत्रकारांना वेगळा न्याय दिला जात असल्याने पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व छोट्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या दीपावलीच्या पार्टी वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार राहुल शेवाळे यांच्या कडून पत्रकारांमध्ये भेदभाव केला जात असल्याचे नेहमीच पत्रकारांकडून दबक्या आवाजात बोलले जात होते. शनिवारी महापौर सुनील प्रभू यांची महापौर बंगल्यावर दीपावली निमित्त अधिकारी आणि पत्रकारांसाठी पार्टी सुरु असतानाच शेवाळे यांच्या कडून काही मोजक्या मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना दीपावलीचे गिफ्ट घरी पोहोचल्याची चर्चा सुरु झाली. एकीकडे या मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना पाकिटे पोहचतात असे बोलले जाते असतानाच गिफ्ट सुद्धा घरी पोहचवली जात असल्याने इतर पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शेवाळे यांनी काही मोजक्या पत्रकारांना घरी गिफ्ट पाठवल्याने मग आम्ही पत्रकार वर्षभर शेवालेंच्या बातम्या प्रसिद्ध करत नाही का असा प्रश्न उपस्थित करत सर्व छोट्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी शेवालेंच्या या प्रकाराचा निषेध केला आहे. मागील वर्षी सुद्धा असाच प्रकार झाला होता या वर्षी सुद्धा असाच प्रकार झाल्याने पत्रकारांमध्ये शेवाळे भेदभाव करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे जर शेवाळे फक्त छोट्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना तुच्छ समजत असतील तर अशावेळी सर्व छोट्या वूत्तापात्रांच्या पत्रकारांनी शेवलेंच्या पार्टीवर बहिष्कार टाकलेलाच बरा असे सांगत बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS