‘थकलेल्या’ राज्यकर्त्यांना व्यासपीठावरच झोप आवरेनाशी झाली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2012

‘थकलेल्या’ राज्यकर्त्यांना व्यासपीठावरच झोप आवरेनाशी झाली



विधिमंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी पुण्यातील विधान भवनात दोन्ही सभागृहांची पहिली बैठक झाली. या समारंभाचे औचित्य साधून खास परिसंवादही झाला. याच कार्यक्रमात ‘थकलेल्या’ राज्यकर्त्यांना व्यासपीठावरच झोप आवरेनाशी झाली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच वनमंत्री पतंगराव कदम, कृष्णा खोरेमंत्री रामराजेनाईक-निंबाळकर, समाजकल्याणमंत्री नितीन राऊत यांनी चक्क ताणून दिली. उद्योगमंत्री नारायण राणे डोळे चोळत होते, तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आरामात चिंतन चालवले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS