मानव अधिकार संस्थेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2012

मानव अधिकार संस्थेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान



मुंबई / रशीद इनामदार (NEWS website:- http://jpnnews.webs.com)
अखिल भारतीय मानव अधिकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटने कडून भारतीय राष्ट्र ध्वजाचा अवमान केला असल्याने या संघटनेच्या पदाधिकाऱ्या विरोधात राष्ट्र ध्वजाच्या अवमान प्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अखिल भारतीय मानव अधिकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या महाराष्ट्र  उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकार्याची होंडा कंपनीची असेंट मोटार क्रंमांक -एम. एच.-०४-ए. वाय.-९९८१ मुंबई उपनगर ,नवी मुंबई ठाणे परिसरात फिरत आहे. या गाडीवर आखिल भारत मानव अधिकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, भारताचा नकाशा असलेला लोगो व लोगोच्या बाजूला तिरंगी उलट्या झेंड्याचे चित्र आणि त्याखाली वाइस प्रेसिडेंट (उपाध्यक्ष) असलेले स्टिकर्स आहेत. 

सदर मानव अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आपल्याकडील अज्ञाना मुळे आपल्या गाडीवर भारताच्या तिरंग्याचा स्टीकर उलट लावला आहे. मानव अधिकार संघटना स्थापन करून आम्ही नागरिकांच्या मानव अधिकारांचे रक्षण करतो, असे भासवून इतर धंदे करणाऱ्या अशा संस्था चालकांना कोणतेही ज्ञान नसल्याने असे प्रकार होतात. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालकडे अशा संघटना नोंदणी केल्या जातात व असे प्रकार केले जातात असे जाणकारांचे म्हणणे आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS