२५ मे रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2014

२५ मे रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभाली साठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइनवर रविवार, २५ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर भायखळा ते विद्याविहार स्थानकां दरम्यान अप धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
मेन लाइनवर भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान भायखळा ते विद्याविहार स्थानकादरम्यानची अप धीम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. या लोकलला कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि परेल या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. अप जलद मार्गावरील ठाणे स्थानकातून सकाळी ११.२१ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत सुटणार्‍या सर्व लोकल्सना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या सकाळी १0.0८ ते दुपारी २.४0 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकात थांबवण्यात येणार असल्यामुळे त्या २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. 

तसेच अप धीम्या मार्गावर लोकल गाड्या विद्याविहार, करी रोड अणि चिंचपोकळी या स्थानकांत थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान सीएसटीला येणार्‍या आणि जाणार्‍या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यानच अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी १0.४१ ते दुपारी ३.२७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यानची वाहतूक ही सकाळी ११.0५ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत बंद राहणार असून पनवेल ते अंधेरी लोकल गाड्यांची वाहतूकही बंद राहणार अहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक काळामध्ये गाड्यांना प्रचंड गर्दी होते, अशा वेळी प्रवाशांनी जास्त गर्दी झालेल्या लोकलमधून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS