मुंबई - लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केलेल्या भाजपा नगरसेविका राजश्री पालांडे यांना मुंबई भाजप अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी पक्षातून तात्काळ निलंबित केले आहे
शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी वॉर्ड क्र. 144 च्या नगरसेविका राजश्री पालांडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली . त्यांच्यावरील आरोप सिद्ध होणे बाकी असले तरी अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रष्ट्राचाराला पाठीशी न घालण्याची भूमिका पक्षाची आहे.
भाजप सरकारने पारदर्शी प्रशासन आणि भ्रष्ट्राचार मुक्त कारभार अशी स्पष्ट भूमिका घेतली असल्यामुळे या कारवाई ची माहिती मिळताच पालांडे यांना पक्षातून अध्यक्ष अॅड आमदार आशिष शेलार यांनी निलंबित केले आहे असे उपाध्यक्ष सुमंत घैसास यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे
