मुंबई महानगर पालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या आदेशाने उपशिक्षणाधिकारी केळुस्कर यांनी शिक्षण विभागातील अधिकार्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी केळुस्कर यांना नोटीस बजावल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. जोगी यांना तात्काळ निलंबित करण्याची एकमुखी मागणी समितीच्या सर्व सदस्यांनी करून समितीची बैठक तहकूब केली.
जोगी यांनी केळुस्कर यांना नोटीस बजावल्याच्या घटनेचा समितीतील सर्वपक्षीय गटनेते, सदस्य आणि अध्यक्षांनीही निषेध करून जोगींना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही जोगी यांचा निषेध करून सभा झटपट तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सभेचे कामकाज तहकूब केले.
झोपड्यांतील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एकांत मिळावा यासाठी शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी एकलव्य अभ्यासिका योजना जाहीर केली आहे; पण त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे अध्यक्षांनी केळुस्कर यांना पत्र पाठवून शिक्षण विभागातील संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली; पण अधिकार्यांच्या बैठकीला लोकप्रतिनिधी कसे उपस्थित राहिले, या मुद्दय़ावरून जोगी यांनी केळुस्कर यांना नोटीस बजावली होती. त्याचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले आणि जोगी यांना निलंबित करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली.