मुंबई / प्रतिनिधी - सुप्रसिद्ध साहित्तिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिलाल्याने मुंबई महानगर पालिकेने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमंत करत नेमाडे यांचा भव्य नगरी सत्कार करावा अशी मागणी पालिकेतील नगरसेवकानी केली.
मुंबई महानगर पलिकेमधे नेमाडे यांच्या अभिनंदना बाबत पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यानी निवेदन केले. या निवेदनावर बोलताना समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकूब मेनन यानी नेमाडे यांचा सत्कार पालिका सभागृहात करावा, नेमाडे यांच्या बरोबर ज्या महाराष्ट्रातील लोकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे अश्या लोकांचाही पालिकेने सत्कार करावा अशी मागणी मेनन यानी केली. दिलीप लांडे यानी नेमाडे यांचा पालिकेने नागरी सत्कार करावा अशी मागणी केली. तर प्रकाश दरेकर यानी नेमाडे यांच्या नावाने पालिकेने चित्रकला स्पर्धा आयोजित करावी अशी मागणी केली. सभागृहात नगरसेवकानी केलेल्या मागणीची दखल घेत महापौर स्नेहल आंबेकर यानी २७ फेब्रुवारी पासून पालिकेत मराठी पंधरवढा साजरा केला जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडल्यास त्यावर नक्की विचार केला जाईल असे सभागृहात सांगीतले.
