शेअर टॅक्सीमधील समोरील जागा महिलांसाठी राखीव -परिवहन मंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेअर टॅक्सीमधील समोरील जागा महिलांसाठी राखीव -परिवहन मंत्री

Share This
मुंबई  : देशात व राज्यात महिला प्रवाशांबाबत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेता महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना प्रवासादरम्यान कुठल्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये म्हणून शेअर टॅक्सींमध्ये चालकाच्या शेजारील आसन महिलांसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.


महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम पावले उचलत रावते यांनी ‘भगिनी सन्मान’ या योजनेची आज सुरुवात केली. या योजनेतील नियम राज्यभरातील सर्व टॅक्सी स्टँडवर लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. एसटी, टॅक्सीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी एसटी बस, टॅक्सी कोणत्या ठिकाणी आहे, किती वेगाने धावते व किती कि.मी. चालविली जाते. याची माहिती व नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीपीएस प्रणालीचा वापर येत्या सहा महिन्यात करण्यात येणार आहे, अशी माहितीही रावते यांनी यावेळी दिली.

प्रवाशांना मदतीसाठी शासनातर्फे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्या हेल्पलाईन क्रमांकावर प्रवाशांनी नोंदविलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा शाासनाचा मानस आहे. एसटी स्थानकांमधील प्रसाधनगृहांची अवस्था बिकट आहे. या प्रसाधनगृहांची लवकरच सुधारणा करण्यात येईल. 10 ते 14 वयोगटोतील शाळकरी विद्यार्थीनींना एस.टी. बसमध्ये प्रवास करताना कुठलाही त्रास व अडचण होऊ नये यासाठी एस.टी.बसमधील मागच्या बाजूचे आसन त्यांच्यासाठी राखीव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही ते म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages