रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून १ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून १ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असतानाच फेरीवाले, भिकार्‍यांची संख्यादेखील वाढत आहे. फेरीवाले, भिकारी यांच्याविरुद्ध रेल्वे पोलीस (आरपीएफ-रेल्वे सुरक्षा दल) वारंवार कारवाई करीतच असतात. २0१४ मध्ये रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून १ कोटी ७८ लाख ३१ हजार ५८0 रुपयांचा दंड वसूल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फेरीवाले आणि भिकार्‍यांविरोधात केलेल्या कारवाईतून तब्बल ७0 लाख ४७ हजार ५८५ रुपयांची कमाई झाली आहे. 

विनातिकीट प्रवास, प्रवाशांमध्ये विनाकारण होणारे वाद, दलालांविरोधातील कारवाई, दारू पिऊन प्रवाशांना त्रास देणे, रुळ ओलांडणे, आरक्षित डब्यांतील आणि महिला डब्यातील घुसखोरी हे आणि अन्य गुन्हे करणार्‍यांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जाते. या कारवाईतून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळते. प्रवाशांकडून नियमभंग करण्याचे प्रकार कमी व्हावेत यासाठी जगजागृती केली जाते. स्थानकांवर उद्घोषणाही केल्या जातात. तरीही प्रवासी याक डे दुर्लक्ष करतात आणि वारंवार हे गुन्हे घडतच राहतात. रेल्वे पोलिसांनी २0१४ मध्ये विविध गुन्ह्यांखाली (एकूण २६ कलमांतर्गत) ६६ हजार ८0९ जणांवर कारवाई केली आहे. या दंडात्मक कारवाईतून १ कोटी ७८ लाख ३१ हजार ५८0 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार ३६0 फेरीवाले आणि भिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ७0 लाख ४७ हजार ५८५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. २0१३ मध्ये २१ हजार ४९८ फेरीवाले आणि भिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून ६८ लाख २७ हजार ६0५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. फेरीवाले आणि भिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून दंड आकारण्यात येतो. त्यामुळे २0१४ मध्ये कारवाई जरी कमी असली तरी दंडाची रक्कम मात्र मोठी आहे. आरक्षित डब्यात अन्य प्रवाशांनी घुसखोरी केल्याचेही ३0 हजार ५५८ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडून ५७ लाख ९ हजार ४५५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
करण्यात आलेली कारवाई 
२0१४ २0१३ 
    गुन्हा        केसेस  दंड      केसेस   दंड 
विनातिकीट प्रवास  ५३७ ४,१९,९३५   ४२९   ३,१७,४१६
प्रवाशांमधील वाद  ५६१  ३,३८,४८0   ४९६  ३,0३,४00
दलांलाविरोधात    १४७  ३,१३,000   २२६ ५,५0,८00 
फेरीवाले-भिकार्‍यांवर १८,३६0 ७0,४७,५८५ २१,४९८ ६८,२७,६0५ 
दारू पिऊन दंगा  ३,३४७ ६,0४,९३0   २,0३१ ४,२८,६५0
रूळ ओलांडणे    ५,९00 ९,७१,८00   ५,९७६ ७,४६,000
आरक्षित डब्यात घुसणे ३0,५५८ ५७,0९,४५५  २६,४३३ ४२,३0,८२0
महिला डब्यात घुसणे ४,१३३ ११,७६,६00  २,९८७ ६,२९,0८0
टपावरून प्रवास   १,८९४ ३,६५,८५0   ४,00४ ६,३४,८५0
धूम्रपान करणे     २१९  २५,२५0       ६४ १0,५५0

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages