कामे चालू असलेल्या ठिकाणी नागरी संदेश प्रदर्शित करण्यासाठी कंत्राटदारांना बंधनकारक करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कामे चालू असलेल्या ठिकाणी नागरी संदेश प्रदर्शित करण्यासाठी कंत्राटदारांना बंधनकारक करा

Share This
पालिकेमार्फत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण किंवा सिंमेट काॅकीटीकरणाची कामे चालू असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या प्रतीबंधात्मक कठडयांवर पाणी वाचवा, विजेची बचत करा, र-त्रीभुण हत्या बंद करा, इंधन वाचवा, इत्यादी प्रकारचे नागरीसंदेश प्रदर्शित करणे संबंधीत कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात यावे अशी ठरावाची सूचना नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी केली आहे.
पालिकेमार्फत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण किंवा सिंमेट काॅकीटीकरणाचे काम चालू असताना त्याठिकाणांची वाहतूक बंद करण्याच्या व काम सुरळीत चालू ठेवण्याच्यादृष्टीने काम चालू असलेल्या ठिकाणांभोवती प्लास्टिकचे मोठे प्रतीबंधक कठडे ठेवण्यात येतात. सदर कठडयांच्या दर्शनी भागात पादचा-यांकरिता व वाहन चालकांकरिता काम चालू आहे प्रवेश निषिद्ध इत्यादि कामासंबंधातील सूचना प्रदर्शित केलेल्या असतात. ही बाब लक्षात आणून पालिकेने रर्-ते दुरुस्ती, डांबरीकरण किंवा सिंमेट कॉक्रिटीकरणाची कामे चालू असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पतिबंधात्मक कठडयांवर पाणी वाचवा, विजेची बचत करा,स्त्रीभ्रूण हत्या बंद करा, इंधन वाचवा अशाप्रकारे नागरी संदेश प्रदर्शित  करणे संबंधीत कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात यावे जेणेकरून लोकांपर्यंत नागरी संदेश पोहोचून जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागेल अशी ठरावाची सूचना नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages