मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा दर्जा मिळावा - कॉंग्रेसची निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा दर्जा मिळावा - कॉंग्रेसची निदर्शने

Share This
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा दर्जा मुंबई शहरास न देता तो गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरास मिळावा असे नक्की केले आहे. याच्या विरोधात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथील दौऱ्या दरम्यान मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात कुपरेज मैदान जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली व काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखविण्यात आले.  या निदर्शनात आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा दर्जा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजूर केल्याप्रमाणे मुंबई शहरास मिळावा अशी प्रमुख घोषणा सुमारे ५०० कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
या प्रसंगी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत मुंबई महिला कॉंग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे, सुनील नरसाळे, वेल्लुस्वामी नायडू, मनपा विरोधीपक्ष नेते बाळा आंबेकर, भुषण पाटील, संदेश कोंडविलकर, रश्मी मेस्त्री, दीक्षिता शहा, गणेश कांबळे, विनोद शेखर, नितीन पाटील, क्लाईव्ह डाईस आणि सुशीबेन शहा या प्रसंगी सहभागी झाले.     

Displaying 02.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages