मुंबई मलबार हिल येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यासह अन्य मंत्र्यांच्या निवासस्थानाचे आणि रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी 'बेस्ट'चे तब्बल एक कोटी ३९ लाख रुपये बिल थकीत असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी हि आकडेवारी माहितीच्या अधिकारातून मिळवली आहे. मार्च २०१५ पर्यंतच्या कालावधीसाठी एक कोटी ३९ लाख २५ हजार ५६० रुपये एवढी रक्कम थकीत असल्याचे निदशर्नाला आले. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मलबार हिल येथील 'अँटिलिया' या इमारतीला पुरविलेल्या 'बेस्ट'च्या वीज बिलाची मार्च, २०१५पर्यंतची तब्बल ६३ लाख रुपये थकबाकी आहे, असेही माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशिलातून आढळले आहे. सुमारे पाच लाख ३० हजार युनिट वीजवापराचे हे बिल आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रातील नागरिकांनी बिल न भरल्यास कारवाई करून वीज खंडित केली जाते मात्र लाखो रुपयांची थकबाकी असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर व अंबानी यांच्या घरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे सामान्य जनतेला एक न्याय आणि मंत्री आणि उद्योगपतीना वेगळा न्याय असे चित्र दिसत असल्याने महाराष्ट्र आणि मुंबई मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

निवासस्थान एप्रिल २०१४ मार्च २०१५ पर्यंतवर्षा २,६४,८८० रु. १३,९०,८८० रु.
रामटेक २,०५,९०० रु. ११,४७,०१० रु.
सातपुडा २,४०,५३० रु. १०,८०,४२० रु.
मेघदूत १,०९०६० रु. ४,६१,८२० रु.
सेवासदन १,८२,१३० रु. ११,०१,२५० रु.
देवगिरी १,५१,१२० रु. ५,५२,०६० रु.
पुरातन १,१७,१४० रु. ५,६२,११० रु.
अजंता १,३५,८०० रु. ८,१५,४५० रु.
रामटेक २,०५,९०० रु. ११,४७,०१० रु.
सातपुडा २,४०,५३० रु. १०,८०,४२० रु.
मेघदूत १,०९०६० रु. ४,६१,८२० रु.
सेवासदन १,८२,१३० रु. ११,०१,२५० रु.
देवगिरी १,५१,१२० रु. ५,५२,०६० रु.
पुरातन १,१७,१४० रु. ५,६२,११० रु.
अजंता १,३५,८०० रु. ८,१५,४५० रु.