मेट्रोत एसव्हीपी युझर्सना कॅश बॅक ऑफर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2015

मेट्रोत एसव्हीपी युझर्सना कॅश बॅक ऑफर

मुंबई : वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेदरम्यान स्टोर व्हॅल्यू पास अर्थात एसव्हीपी युझर्सना आता कॅश बॅक ऑफरचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी ही सवलत उपयुक्त ठरणार असल्याचे मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे.


वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेदरम्यान घाटकोपर ते असल्फा तिकीट १0 रुपये तर (स्मार्ट कार्डने १0 रुपये), घाटकोपर ते विमानतळ रोड २0 रुपये (स्मार्ट कार्डने १८ रुपये), घाटकोपर ते अंधेरी ३0 रुपये (स्मार्ट कार्डने २७ रुपये), घाटकोपर ते वर्साेवा ४0 रुपये (स्मार्ट कार्डने ३२ रुपये), वर्साेवा ते डी. एन. नगर १0 रुपये (स्मार्ट कार्डने १0 रुपये) वर्साेवा ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे २0 रुपये (स्मार्ट कार्डने १८ रुपये), वर्साेवा ते साकीनाका ३0 रुपये (स्मार्ट कार्डने २७ रुपये) असे दर ११ जानेवारीपासून आकारण्यात येत आहेत. मात्र, आता एसव्हीपी धारकांना आता ५ ते १0 टक्क्यांपर्यंतची सवलत कॅश बॅक प्रणालीवर आधारित फेर्‍यांमध्ये मिळणार आहे. १ मेपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ३000 प्रवाशांनी याचा लाभ उठवला आहे.

जे एसव्हीपी धारक महिनाभरात ३0 फेर्‍यांचा प्रवास करतात त्यांना मे महिन्यात या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. ५ टक्के सवलतीमुळे ३0 ते ३४ फेर्‍या व १0 टक्के सवलतीमुळे ३५ फेर्‍यांचा प्रवास करता येणार आहे. जर ४0 रुपयांच्या तिकिटाचे एसव्हीपीप्रमाणे २७ रुपये तिकीट दराने प्रवास केल्यास १0 टक्क्यांप्रमाणे १0८ रुपये फायदा होणार आहे. त्यावेळेस विविध कर कापून ९७ रुपयांची कॅश बॅक ऑफर असणार आहे. कॅश बॅक सुविधा तिकीट इश्यू मशीन मध्ये इन्सर्ट केल्यास ५ जून रोजी महिनाभराच्या पडताळणीनंतर कॅश बॅक रक्कम जमा करण्यात येणार आहे. एसव्हीपी कार्डधारकांचे नाव, मोबाइल नंबर, कार्ड नंबर ९0२२३१0९00 येथे पाठवल्यास किंवा मेट्रो स्थानकावर ही माहिती दिल्यास स्वयंचलित एएफसी प्रणालीने ५ जून रोजी रक्कम जमा होणार आहे.

या नव्या सुविधेमुळे एसव्हीपी धारकांमध्ये वाढ होणार असून इतर सुविधांचा लाभधारकांना घेता येणार आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेत पहिल्यांदाच अशा प्रकारची कॅश बॅक ऑफर सुरू केल्याचे एमएमओपीएलकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS