शहीद अधिकाऱयांची सर्व देणी ७ दिवसांच्या आत देणार - आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2015

शहीद अधिकाऱयांची सर्व देणी ७ दिवसांच्या आत देणार - आयुक्त

जखमी अधिकारी - जवान यांना सर्वोच्च वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश
मुंबई / प्रतिनिधी - गोकुळ हाऊस इमारतीला लागलेली आग ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. शहीद अधिकाऱयांच्या कुटुंबियांप्रती महापालिका सांत्वना व्यक्त करीत असून शहीद अधिकाऱयांची सर्व शासकीय देणी ७ दिवसांच्या आंत त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात येतील. तसेच जखमी अधिकारी व जवान यांना सर्वोच्च वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. काळबादेवी परिसरातील गोकुळ हाऊस या इमारतीला काल (दिनांक ९ मे, २०१५) सायंकाळी आग लागून घडलेल्या दुर्घटनेप्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला.


या दुर्घटनेतील जखमी झालेल्या प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन व इतर जवान यांना आवश्यक ते सर्वोच्च वैद्यकीय उपचार सुविधा देण्याचे प्रशासनातर्फे निर्देश दिले असून त्यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे या जातीने लक्ष ठेवून आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या एकूण घटनेची तपशिलवार चौकशी करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS