मुंबई महापालिकेचे कानडी शाळांवर प्रेम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेचे कानडी शाळांवर प्रेम

Share This
कन्नड माध्यमांच्या आठवीच्या वगार्ला मान्यता

मुंबई / प्रतिनिधी - बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २॰॰९ अंतर्गत मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मागदर्शनाखाली पालिकेच्या शिक्षण विभागानी आपल्या अगंर्तत येणाऽया ११६ प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २॰१५-१६ साठी १५२ आठवीच्या वर्गांना मान्यता देण्यात आली असुन त्यामध्ये २ कन्नड माध्यमांच्या वगार्चा समावेश आहे. मराठी, हिंदी, उर्दु, गुजराती, तामिळ आणि कन्नड माध्यमांच्या वर्गांना मान्यता देऊन भाषा समभाव राखण्याचा प्रयत्न यावेळी पालिकेकडुन करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होत आहे. ही संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना राबविण्यासाठी मोठया प्रमाणात गरज आहे. मुंबई महापालिकेकडुन घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे खासगी शाळांना मोठा फटका बसणार असुन पालकांना दिलासा देणारा निर्णय आहे. ज्या भागातील मराठी आणि इतर भाषिक शाळांमधुन सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी या वाढीव आडवीच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडुन मराठी माध्यमां पेक्षा इतर माध्यमांच्या आठवीचे वर्ग वाढविण्यावर जास्त प्रमाणात भर देण्यात आला आहे. मराठी माध्यमांच्या २६ शाळांमध्ये, हिंदी माध्यामांच्या ४॰, उर्दु माध्यमांच्या २॰, इंग्रजी माध्यामांच्या १॰, गुजराती माध्यमांच्या ८, तामिळ माध्यमांच्या ८ आणि कन्नड माध्यमांच्या २ शाळांमध्ये हे नवीन आठवीचे वर्ग सुरुकरण्यात येणार आहे. मुंबईतील सुभाष नगर मनपा कन्नड शाळा चेंबुर आणि सोडावाला लेन मनपा कन्नड शाळा बोरीवली (पश्चिम) या दोन शाळांमध्ये आठवीच्या वगार्ला मान्यता दिली आहे. सर्व भाषा समभावाची व्याख्या मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागांनी राज्याच्या सिमाभागात आणि इतर राज्यांमध्ये जाऊन पहावी आणि त्याठिकाणी मराठी माध्यमांच्या शाळांना देण्यात येणाऽया सुविधा आपल्या शाळांमध्ये देता येतील का यावरदेखील यावेळी विचार करण्यात यावा.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages