महिलांचा छळ करणारा पालिकेच्या विधी खात्याचा संयुक्त कायदा अधिकारी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2015

महिलांचा छळ करणारा पालिकेच्या विधी खात्याचा संयुक्त कायदा अधिकारी होणार

महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या विधी खात्याच्या संयुक्त कायदा अधिकारी पदी जे. जो. झेवियर या अधिकाऱ्याची नेमणूक होणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहापुढे सादर झाला असून त्याला सोमवारी पालिका सभागृहात मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने  विधी विभागातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आता पालिकेचेही आता काही खरे नाही अशी चर्चा सध्या पालिका मुख्यालयात होत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या विधी खात्यामध्ये जे. जो. झेवियर हे उप कायदा अधिकारी म्हणून नोकरीला आहेत. या उप कायदा अधिकाऱ्याने आपल्या हाता खालील महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याची या विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तत्कालीन पालिका आयुक्त व तत्कालीन विधी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे आपली नावे न टाकता निनावी लेखी तक्रार केली होती. पालिकेत काम करणाऱ्या महिलां कर्मचाऱ्याबाबत तक्रार असल्याने या प्रकरणाची सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र, अक्षरा या सारख्या संस्थांकडून चौकशी करणे गरजेचे असताना तत्कालीन आयुक्त सिताराम कुंटे आणि अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी या प्रकरणाची चौकशी न करताच हे प्रकरण बंद करून टाकले होते. 

झेवियर हे पालिकेच्या विधी खात्यात उप कायदा अधिकारी असल्याने त्यांचा संबंध सातत्याने पालिकेच्या विविध कोर्टात सुरु असलेल्या केसमधील संबंधीत विविध व्यक्तींशी येतो. संबंधीत व्यक्ती झेवियर यांना पालिका मुख्यालय आणि मुख्यालय बाहेर केसेस संदर्भात तडजोड करायला येत असतात. काही लोक तर झेवियर यांना प्रत्येक ब्रीफ मागे पैसे देत आहेत. पालिकेकडून पगार घेणाऱ्या या अधिकाऱ्याने पगारा व्यतिरिक्त प्रचंड माया जमावली आहे. या वरच्या कमाईवर झेवियर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या खिशात घालून महिलांविरोधातील केस बंद करण्यास भाग पाडली असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. 

झेवियर यांची संयुक्त कायदा अधिकारी या पदावर नेमणूक करू नये असे काही महिन्या पूर्वी विधी समिती मध्ये स्पस्थ करत झेवियर यांना संयुक्त कायदा अधिकारी या पदावर नेमणूक करण्याचा प्रस्ताव दाफातरी दाखल करण्यात आला होता. परंतू सीताराम कुंटे यांनी २७ एप्रिल २०१५ रोजी स्वता आयुक्त पदावरून पायउतार होताना झेवियर यांची संयुक्त कायदा अधिकारी या पदावर नेमणूक करण्याच प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाला सोमवारी पालिका सभागृहात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सातत्याने पैशांच्या जोरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना खिशात घालणाऱ्या झेवियर यांची संयुक्त कायदा अधिकारी या पदावर नेमणूक होणार आहे यामुळे कायदा विभागातील महिला कर्मचाऱ्यावर अन्याय व अत्याचारात वाढ होणार असल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS